गोवा ही माझी जन्मभुमी नसली तरी मला गोवा आणि गोव्याच्या प्रत्येक गोष्टीची ओढ वाटते. आणि गोवा म्हटलं की बा. भ. बोरकरांचा उल्लेख यायलाच हवा. कलाकाराचं अस्तित्व हे त्याच्या प्रतिभेवर टिकून असतं. जोवर प्रतिभा साथ देते तोवर त्याची उपज असते. अशीच एक बाकीबांनी प्रतिभेला मारलेली हाक.